गरोदरपणात कोणते पदार्थ टाळावेत?

आहारतज्ज्ञ असलेल्या जी. पद्मा विजय यांनी स्थूलपणा या विषयावर संशोधन केलं आहे. मुंबईच्या एस.एन.डी.टी. आणि मॉडर्न कॉलेजमध्ये त्यांनी ‘आहारविषयक संशोधक’ म्हणून काम केलं आहे. वनस्पतीशास्त्राची उस्मानिया विद्यापीठाची मास्टर्स डिग्री त्यांना प्राप्त झाली आहे. मुंबईमध्ये त्यांचं ‘डायट थेरपी अँड न्युट्रिशन’ नावाचं चिकित्सा केंद्र आहे. ‘फेमिना’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ इत्यादी नियतकालिकांमध्ये त्यांचे आहारविषयक लेख प्रसिद्ध होत असतात.

अनुवाद :
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.


लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.
या पुस्तकात टाळावेत असे काही शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची माहिती दिली आहे. हे पदार्थ का खाऊ नयेत, त्यामागील शास्त्रीय कारणं कोणती व खाल्ल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील सांगितलं आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीला आपला आहार ठरवताना योग्य ती सावधता बाळगता येईल.
प्रत्येक गरोदर स्त्रीचं स्वप्न असतं, सुदृढ व लोभस बाळाचं! हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.


75.00 Add to cart