त्र्यंबक कृष्णराव टोपे

त्र्यंबक कृष्णराव टोपे यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९१४ साली झाला. त्यांनी आठ वर्षं (१९३९ ते १९४७) माटुंग्याच्या रूईया कॉलेजमध्ये संस्कृतचे अध्यापन व अकरा वर्षं (१९४७ ते १९५८) गव्हर्न्मेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं अध्यापन केलं आणि १९५८ ते १९७५ या कालावधीत लॉ कॉलेजचे प्राचार्यपद भूषवलं होतं. त्यांनी भूषवलेली इतर पदं आणि त्यांचा कार्यकाळ पुढीलप्रमाणे - (१) भारताच्या विधी आयोगाचे सदस्य (१९६२ ते १९६८), (२) मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (१९७१ ते १९७७), (३) महाराष्ट्र विधी आयोगाचे सदस्य (१९७७ ते १९८०), (४) साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य (१९८० ते १९८५), (५) मुंबईचे शेरीफ (नगरपाल) (१९८६) २० फेब्रुवारी १९९४ रोजी त्यांचं निधन झालं.