सुजाता चंपानेरकर

सुजाता चंपानेरकर यांचा जन्म 18 जानेवारी 1954 चा, तर त्यांचा मृत्यू 30 एप्रिल 1999 रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी आर्ट्स शाखेतील पदवी मिळवली. एक कर्तव्यदक्ष गृहिणीची भूमिका पार पाडताना त्यांनी 'रोहन प्रकाशन'च्या व्यवस्थापनाचे कार्यही सांभाळलं. त्या'च प्रमाणे काही पुस्तकांचं संपादनही केलं. 'पाहुणचार', ‘क्रोशाचे विणकाम', 'आहार गाथा' ही त्यांपैकी त्यांनी संपादित केलेली पुस्तकं. पुणे आकाशवाणीवरही आहार व आरोग्य या विषयांवर त्यांचे कार्यक्रम झाले. वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ करणं त्यांचा आवडता प्रांत. त्यातून त्यांनी 'आईस्क्रीम व सूप्स' ही पुस्तकं साकारली व ती अतिशय लोकप्रिय ठरली. 'महाराष्ट्र टाईम्स' व 'साप्ताहिक सकाळ' या सुप्रसिद्ध दैनिकांतून व नियतकालिकांतून त्यांनी सातत्याने लेखन केलं. अकाली झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्यातली लेखिका सीमित राहिली.