शाश्वती नंदी

शाश्वती नंदी यांचा जन्म ८ ऑगस्ट १९६६ रोजी झाला. त्या विज्ञानाच्या पदवीधर, त्यांचं संपूर्ण शिक्षणा कोलकाता येथून झालं. पश्चिम बंगाल मानवाधिकार कमिशनमध्ये विशेष पदावर कार्यरत. त्यांची पहिली कादंबरी 'वसंत अफुरान' 'शारदीय' मध्ये प्रकाशित. त्याशिवाय भरपूर कथालेखन. 'वृष्टीर गंध', 'गोल्डफिश', 'अमलताश' यांसारख्या 'देश' आणि 'आनंदबाजार' पत्रिकेत प्रकाशित झालेल्या कथांना वाचकांची पसंती. त्यांच्या 'स्वप्न बलाका' या पहिल्या कथासंग्रहास २०१० सालचा शहीद प्रद्योतकुमार स्मृती उत्कर्ष पुरस्कार प्राप्त झाला आहे. दुसरा कथासंग्रह 'जोखन वृष्टी एलो' २०१३ साली प्रकाशित. 'दैत्यर बागान' या कादंबरीसाठी त्यांना कोलकाता विश्व विद्यालयाचा 'लीला पुरस्कार' प्राप्त झाला. त्यांच्या कथांवर आधारित तीन नाटकं कोलकाता आकाशवाणीवरून प्रसारित.