सानिया

सानिया यांचा जन्म १० नोव्हेंबर १९५२ रोजीचा, सांगली इथला. त्या मुंबई विद्यापीठातून एम.कॉम झाल्या आणि नॅशनल लॉ स्कूल, बंगळुरू येथून त्यांनी मानवाधिकार कायदा पदविका संपादन केली. मराठी साहित्यात त्या सिद्धहस्त लेखिका म्हणून ओळखल्या जातात. आजपर्यंत त्यांचे चौदा कथासंग्रह, चार कादंबऱ्या आणि दोन ललितसंग्रह प्रकाशित आहेत. हिंदी, कन्नड, उर्दू, जर्मन आणि इंग्रजी भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या अनेक कथा व कादंबऱ्या नाटिका, दूरदर्शन मालिका अशा स्वरूपात रूपांतरित झाल्या आहेत. त्यांच्या साहित्याला मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, विभावरी पाटील पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार आणि ग.दि.मा पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांचा समावेश होतो. गेली पंचवीस वर्ष त्या स्वयंसेवी समुपदेशक व प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. कथासंग्रह: शोध, प्रतीती, खिडक्या, दिशा घराच्या, ओळख, भूमिका, वलय, प्रयाण, परिमाण, ओमियागे, अशी वेळ, संपादित सानिया, पुन्हा एकदा, सुरवातीचे दिवस ललित: प्रवास वाटा आणि मुक्काम (सहलेखन) कादंबरी: स्थलांतर, आवर्तन, अवकाश, निरंतर वाटेवर