संग्राम गायकवाड

संग्राम गायकवाड भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी. सध्या पुण्यामध्ये आयकर आयुक्त म्हणून कार्यरत. सीओइपीमधून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतल्यानंतर थोड्या कालावधीसाठी स्वयंसेवी संस्थेमध्ये काम. त्यानंतर मुंबई, कोल्हापूर, धारवाड, दावणगेरे येथे आयकर विभागांतर्गत विविध पदावर नेमणूक. कर प्रशासनातील सुधारणा, धोरणनिर्मितीच्या प्रक्रिया, अंमलबजावणीच्या रचनांमधील सुधारणा हे अभ्यासाचे विषय. विविध नियतकालिकं आणि दैनिकांमधून कविता, कथा आणि लेख प्रकाशित. 'सिलेक्टेड एसेज ऑफ डॉक्टर एस. एस. कलबाग या पुस्तकाचं संपादन. 'विज्ञानाश्रम' या विषयावरील डॉक्युमेंटरीच्या निर्मितीमध्ये सहभाग. साहित्य, समाजशास्त्र, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, भटकंती, पक्षीनिरीक्षण, इत्यादी विषयांची आवड.. 'आटपाट देशातल्या गोष्टी' ही कादंबरी २०१८ साली प्रकाशित. या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा उत्कृष्ट कादंबरीसाठीचा 'दिवदत्त पाटील पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'वा. म. जोशी स्मृती पुरस्कार' आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचा 'श्री. ना. पेंडसे पुरस्कार' प्राप्त.