सु.ल. खुटवड
विनोदी लेखक म्हणून ख्याती असलेल्या सु.ल. खुटवड यांनी मराठीत एम.ए केलं असून त्यानंतर पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यांची अनेक विनोदविषयक पुस्तकं प्रकाशित असून ती लोकप्रियही आहेत. राजगुरूनगर येथे भरलेल्या हुतात्मा राजगुरू साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच फलटण येथे भरलेल्या यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. विनोदी साहित्यातील योगदानाबद्दल आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार, उत्कृष्ट ग्रामीण साहित्यिक पुरस्कार, तोरणा पुरस्कार, सह्याद्रीनंदन साहित्य पुरस्कार, शिवांजली साहित्य गौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. दै सकाळच्या पुणे आवृत्तीत ते अनेक वर्षं पत्रकार असून त्यांनी सकाळमध्ये विपुल लेखन केलं. 'विनोदाचे जीवनातील स्थान' या विषयावर त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी व्याख्यानंही दिली आहेत.