रवींद्र पांढरे
रवींद्र पांढरे यांचा जन्म खानदेशातील पहूर ह्या गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असले, तरी गाव, गावचे लोक, त्यांची बोली, गावाची शेती, शिवार यांच्याशी जन्मतःच जुळलेली नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे गाव आणि गावाचं शिवार हे लेखनाचे केंद्र , गावाची बोली हे साहित्याचं लेणं.
• प्रकाशित साहित्य :
लव्हाळ्याचे तुरे ( कवितासंग्रह )
मातीतली माणसं ( कथासंग्रह )
अवघाचि संसार ( कादंबरी )
गाण्यात झुलै रान ( किशोर कविता )
कथोकळी ( ललित गद्य )
पोटमारा ( कादंबरी )
प्रकाशनाच्या वाटेवर : पोरकी माणसं ( कथासंग्रह )
• पुरस्कार : →
मातीतली माणसं ह्या कथासंग्रहास दोन पुरस्कार
१ ) रोहमारे ट्रस्टचा उत्कृष्ट ग्रामीण साहित्यनिर्मिती पुरस्कार
२ ) राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ग.ल. ठोकळ कथा पुरस्कार
• सन्मान : 'अवघाचि संसार' कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट 'घुसमट'
कथोकळी ' पहूर ( पेठ ) , ता . जामनेर , जि . जळगाव