पुष्पा भावे
मुंबई विद्यापीठात अनेक वर्षं मराठी भाषा विषयाच्या अध्यापक म्हणून पुष्पा भावे कार्यरत होत्या. त्यांना महाराष्ट्रातील आघाडीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व समीक्षक म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यांनी दलित व आशियातील अल्पसंख्यांकांच्या समस्यांबाबत विविध परिसंवाद व नियतकालिकांतील लेखनाद्वारे सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. ‘पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमॉक्रसी' या संघटनेच्या त्या कार्यकारी सदस्य होत्या. ‘आशिया-युरोपमधील शांततेचे प्रश्न' या विषयावरील चीनमधील परिषदेत व त्याचप्रमाणे श्रीलंकेत अल्पसंख्यांकाच्या समस्येच्या निवारणार्थ गेलेल्या शिष्टमंडळात, प्रतिनिधी म्हणून त्यांचा सहभाग होता. मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘सेहर' संस्थेसाठी त्यांचे योगदान असून नागरी स्वातंत्र्य चळवळीतही त्यांचा सहभाग होता.