प्रकाश अकोलकर
लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये सोमनाथच्या मंदिरापासून अयोध्येच्या दिशेने काढलेली रथयात्रा मुंबईत आली, तेव्हापासूनच्या या प्रवासाकडे
'दिसलं तसं, बघितलं जसं...' या नजरेने पाहणारा पत्रकार.. पुढे अयोध्येत बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर १९९२-९३ मध्ये मुंबईत सुरू झालेल्या दंग्यांचा साक्षीदार. उत्तर प्रदेशातील १९९९ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांचे वार्तांकन.
२०१४ मध्ये वाराणसी मतदार संघातील घडामोडींचं प्रत्यक्ष भेट देऊन विश्लेषण. लोकसभा (२०१९ ) बिहार विधानसभा उत्तर प्रदेश ( २०१७ ), गुजरात ( २००७ ) यांचं प्रत्यक्षदर्शी विश्लेषण.
'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्राच्या माध्यमातून तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता त्यातून मुंबई महानगराची जडणघडण तसंच शिवसेना यांच्याविषयीच्या कुतुहलाचं अभ्यासात रूपांतर. शिवसेनेच्या पहिल्या तीन दशकांच्या इतिहासाचा प्रथमच विवेचक आढावा घेणारं पुस्तक, 'जय महाराष्ट्र'
१९९ ७ मध्ये प्रकाशित. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्याच पुस्तकाचं पुनर्लेखन.
राजकारणी, नोकरशहा आणि बिल्डर यांचं साटंलोटं उघड करणारं 'मुंबई ऑन सेल' पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित. 'म.टा.' मध्ये तीन दशकं राजकीय तसंच सांस्कृतिक बातमीदारीबरोबरच महानगरी, झोत, प्रसंग, बहर, पेनड्राइव्ह अशा विविध सदरांचे लेखन. 'झोत' याच नावानं निवडक व्यक्तिचित्रांचा संग्रह व भेटलेल्या अनेक सुहृदांचा आणि आठवणींचा कोलाज 'मित्रमयजगत' ही पुस्तकं प्रकाशित. सनदी अधिकारी एस. एस. गिल यांच्या 'करप्शन ऑफ पॅथॉलॉजी' या ग्रंथाचा 'भ्रष्टांगण' तर ज्युलियन क्रेडॉल हॉलिक यांनी गंगोत्री ते कोलकाता असा प्रवास करून लिहिलेल्या पुस्तकाचा 'गंगा' याच शीर्षकानं अनुवाद. सध्या 'सकाळ' माध्यम समूहात राजकीय संपादक .