नरेंद्र चपळगावकर

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं नाव मराठी साहित्य विश्वात वैचारिक लेखन करणारे लेखक म्हणून आदराने घेतलं जातं. त्यांनी मराठी व कायदा या विषयांचे काही अध्यापन केलं आणि त्यानंतर 27 वर्षं वकिली केली. मुंबई उच्च न्यायालयाचे ते नऊ वर्षं न्यायाधीश होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ते गुणश्री प्राध्यापक होते. तसंच आय. एल. एस. विधि महाविद्यालयात ते फोर्ड अध्यासनाचे मानद प्राध्यापक होते. कायदा, समाजव्यवस्था आणि साहित्य या विषयात त्यांना रस असून त्यांनी याविषयी विपुल लेखन केलं आहे. ते माजलगाव येथे 2005 साली भरलेल्या 26व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद; राजवाडे संशोधन मंडळ, धुळे; कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक; प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई अशा विविध संस्थांची त्यांनी मानाची पदं भूषवली आहेत. अनेक महत्त्वाच्या मानसन्मानांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

लेखकाची पुस्तकं

Explore Other Authors