नंदिनी उपाध्ये

नंदिनी विजय उपाध्ये यांनी मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात प्रथम श्रेणीत एम.ए. केलं तर एस.एन.डी.टी विद्यापीठातून प्रथम श्रेणीत मराठी विषयात एम.ए. केलं आहे. तसेच ‘धनुर्धारीकृत वाईकर भटजी – एक अभ्यास' हा विषय घेऊन डॉ.चंद्रकांत वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली एम.फिल केलं आहे. त्यांना वाचन, सामाजिक व शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड असून गेली अनेक वर्षं पाचगणी जवळील एका छोट्या खेड्यात त्यांचं वास्तव्य आहे.

लेखकाची पुस्तकं

मालगुडीचा संन्यासी वाघ


आर.के. नारायण

अनुवाद : नंदिनी नारायण


आर.के.नारायण यांच्या प्रसिद्ध `मालगुडी’ गावातील ही कथा. पण ही कथा स्वामी किंवा कोणत्या गावकर्‍याची नाही. ही गोष्ट आहे चक्क एका वाघाची आणि त्याच्या गुरुची!
गावतल्या कोंबड्या-बक‍‍र्‍या-म्हशींची शिकार करून गावकर्‍यांना त्रास देणार्‍या वाघाला एका सर्कशीचा कॅप्टन शिताफीने पकडतो. मोकळ्या जंगलातून माणसाच्या बंदिस्त जगात गेलेला वाघ सर्कशीमधलं विदारक आयुष्य जगत असतो. या `हिंस्र’ प्राण्याची माणसासारख्या `सुसंस्कृत’ प्राण्याकडून सुटका करतो तो एक साधू!
थेट वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा नारायण अतिशय रंगतदारपणे फुलवतात.
या साधू आणि वाघामध्ये असणारं गुरू-शिष्याचं नातं त्यांनी अतिशय सुंदररित्या रेखाटलं आहे. वाघाच्या दृष्टिकोनातून माणूस कसा आहे, देव म्हणजे काय आणि जीवनाचं उद्दिष्ट काय अशी तात्त्विक चर्चा या पुस्तकात होते. वाघाच्या तोंडून सांगितलेली ही कथा सहजपणे खुलत जाते आणि विनोदी वाटता वाटता आध्यात्मिक पातळीवर नेते.
`मी कोण?’ या चिरंतन प्रश्नाचा ठाव घेत चिंतन करायला लावणारा…मालगुडीचा `संन्यासी’ वाघ!


260.00 Read more