मनस्विनी लता रवींद्र
मनस्विनी लता रवींद्र ही विविध माध्यमांतून स्वैरपणे लिखाण करणारी लेखिका आहे . लहानपणी ती कविता लिहायची , पण पुढे नाटकाचं औपचारिक शिक्षण घेतल्यावर तिला नाटक हे माध्यम हाताळून बघावंसं वाटलं . एकविसाव्या वर्षी तिचं पहिलं नाटक आलं सिगरेटस् . टेलिव्हीजनच्या मालिकांपासून ते चित्रपट , ऑडिओ सिरिज , वेब सिरिज असे सर्व प्रकारचं लिखाण ती करते . तिने कथालेखन सुरू केलं असून नाटक आणि कथा दोन्हीमध्ये आकृतिबंध आणि आशय यात काही प्रयोग करून बघते आहे . नातेसंबंध आणि त्यातलं राजकारण यात तिला अधिक रुची असून , माणसाचे तपशील तिला रोचक वाटतात .