महमूद ममदानी
जगातिक ख्यातीचे राजकीय समीक्षक, विचारवंत आणि मानववंशशास्त्रज्ञ म्हणून महमूद ममदानी यांचा लौकिक आहे. हॉवर्ड विद्यापीठातून १९७४ साली पीएच.डी केलेल्या महमूद ममदानी यांनी अनेक विषयांवर संशोधनपर व समीक्षापर लेखन केलं असून ‘आफ्रिकन अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स, कोलोनिअलिझम् अँड पोस्ट-कोलोनिअलिझम् अँड द पॉलिटिक्स ऑफ नॉलेज प्रॉडक्शन' या विषयावरील त्यांचा अभ्यास जागतिक चर्चाविश्वात विशेष दखलपात्र ठरला आहे. कोलम्बिया युनिव्हर्सिटीत हर्बट लेहमन प्रोफेसर म्हणून आणि युगांडांच्या ‘मॅकॅरेरे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च' संस्थेचे संचालक व प्राध्यापक म्हणून पदं भूषवलेल्या ममदानी यांचा जागतिक स्तरावरील आघाडीच्या ‘पुरोगामी विचारवंतां’मध्ये समावेश होतो.