एम.के. रूस्तमजी

एम. के. रुस्तुमजी हे टेल्को कंपनीचे अत्यंत वरिष्ठ व्यवस्थापक होते. व्यवस्थापनशास्त्रावर त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना जगभर प्रचंड मागणी आहे. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्पेन, जपान, ब्राझिल, झेकोस्लाव्हाकिया व इस्राइल या देशांमध्ये त्यांची पुस्तकं लोकप्रिय झाली आहेत. त्यांच्या पश्चातही अजूनही त्यांची पुस्तकं विक्रीचे नवेनवे विक्रम करत आहेत. कारण व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव असलेल्या अनुभवी माणसांनी क्वचित व्यवस्थापनावरील पुस्तकं लिहिली. 'उद्योग व्यवसायातील मानवीसंबंध' या विषयांवर 'फर्स्ट ड्यूक ऑफ एडिनबर्ग्स कॉन्फरन्स’मध्ये रुस्तुमजींनी सहभाग घेतला होता. त्यानंतर भारत सरकारने त्यांची 'नवल टाटा कमिटी ऑन शेअरिंग द गेन्स ऑफ प्रॉडक्टिव्हिटी' या समितीवर मालकांचे प्रतिनिधी म्हणून खास नेमणूक केलेली होती. त्याशिवाय अत्यंत महत्त्वाच्या अशा व्यवस्थापन क्षेत्रातील संस्थांमध्ये त्यांचा सल्लागार म्हणून सहभाग होता.