जेरी पिंटो

कवी, कादंबरीकार, अनुवादक आणि पत्रकार म्हणून जेरी पिंटो प्रसिद्ध आहेत. ते मुंबईत राहतात. ‘एम अँड द बिग हूम' या त्यांच्या ‘द हिंदू लिटररी प्राईझ आणि द क्रॉसवर्ड बुक अ‍ॅवॉर्ड फॉर फिक्शन’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे तसंच, ‘हेलन : द लाईफ अँड टाइम्स ऑफ अँन एच –बॉम्ब’ या चित्रपटविषयक सर्वोत्तम पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे ते लेखक आहेत. प्रसिद्ध मराठी लेखक दया पवार यांच्या ‘बलुतं' या आत्मचरित्राचा तसंच, मल्लिका अमरशेख यांच्या ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय' या आत्मचरित्रपर लेखनाचा आणि वंदना मिश्रा यांच्या ‘मी मिठाची बाहुली’ या आत्मकथनाचा इंग्लिश अनुवाद त्यांनी केला आहे. जेरी पिंटो यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आलं असून त्यांना येल युनिव्हर्सिटीच्या विन्डहॅम-कॅम्पबेल पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.