हॅपीमॉन जेकब

डॉ. हॅपीमॉन जेकब यांनी भारतीय परराष्ट्र धोरण, संरक्षण, काश्मीर समस्या आणि भारत पाकिस्तान संबंध या विषयांवर अनेक पुस्तकं आणि अभ्यासपूर्ण लेख लिहिलेले आहेत. ते दिल्लीच्या 'स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये 'डिप्लोमसी अँड डिसआर्मामेंट' या विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून २००८ पासून कार्यरत आहेत. 'द हिंदू 'या दैनिकाचे स्तंभलेखक म्हणून आणि त्याचप्रमाणे, 'ग्रटर काश्मीर' या वृत्तपत्रांसाठी त्यांनी अनेक विद्वत्तार्ण लेख लिहिले आहेत. त्याचप्रमाणे, 'द वायर' या वृत्त संकेतस्थळावर ते सातत्याने राष्ट्रीय विषयावरील कार्यक्रमांचं संयोजन करत असतात. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शांततापूर्ण संबंध राहावेत, या उद्देशाने 'ट्रॅक-२' संवादांच्या माध्यमांतून ते गेली अनेक वर्षं प्रयत्नशील आहेत. 'चाओ फ्रया इंडिया पाकिस्तान डायलॉग', 'पगवाश इंडिया - पाकिस्तान डायलॉग' आणि 'ओटावा डायलॉग ऑन इंडिया - पाकिस्तान न्युक्लीअर रिलेशन्स' या तीन परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरावर ख्यातकीर्त असलेल्या जेकब यांनी महत्त्वाच्या विषयांवर विद्वत्तापूर्ण पुस्तकं लिहिलेली आहे.