धनंजय धुरगुडे
खडतर संघर्ष करत त्यातून मार्ग काढत शिक्षक झालेले धनंजय धुरगडे यांनी आपल्या लेखनातून व्यक्तिगत जीवनसंघर्षाबरोबर धनगर समाजाच्या अनेक पदरी जीवनाचा बारकाईने उलघडा केलेला आहे. त्यांचं 'माझा धनगरवाडा’ हे आत्मकथन वाचल्यावर याची साक्ष पटते. यात धनगरांच्या प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, नातेसंबंध, श्रद्धा व संस्कृती अशा कितीतरी अंगांनी धनगरी जीवनाचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे.
सातारा जिल्ह्यातील पाडळी या लहान गावात ९ मार्च १९७३ रोजी धुरगुडे यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डी.ई.ई ही पदवी प्राप्त केली आणि सध्या ते शासकीय तांत्रिक विद्यालय, कराड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
'माझा धनगरवाडा' या त्यांच्या पहिल्या साहित्यकृतीला 'संयुक्त राष्ट्रसंघ संलग्न संस्था' व 'इंटरनॅशनल जस्टीश फेडरेशन' आणि 'आयनॉक्स नॅशनल युनिव्हर्सिटी' यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा 'आशियाई सामाजिक सांस्कृतिक पुरस्कार-२०१७' हे पारितोषिक मिळालं आहे.