भगवान दातार
पत्रकारितेच्या क्षेत्रांत सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ भगवान दातार कार्यरत आहेत. त्यांनी लोकसत्ता, केसरी, लोकमत, तरुणभारत, पुढारी, प्रभात आदी दैनिकात विविध पदांवर काम केलं आहे. तरुणभारत, पुणेच्या संपादकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणाच्या वेळी अयोध्येत उपस्थित राहून वार्तांकन केलं होतं. त्यांनी संरक्षण मंत्रालयाचा वॉर करस्पाँडन्टचा अभ्यासक्रम महू, नासिराबाद, जोधपूर, दिल्ली आणि कोचीन येथून पूर्ण केला आहे. त्यांची ‘टु द लास्ट बुलेट’, ‘शेवट नसलेलं युद्ध’, ‘बी किंमग इंडियन’ ही अनुवादित पुस्तके गाजली. ‘खिल्ली’ हे राजकीय विडंबनपर लेखांचं स्वतंत्र विनोदी पुस्तक आणि आयएस अधिकाऱ्यांच्या कामाबद्दल ‘कलेक्टिव्ह एनर्जी’ या पुस्तकाचं संपादन केलं आहे. ‘सरदार वल्लभभाई पटेल' व ‘फील्ड मार्शल सॅम माणेकशा' ही त्यांनी अनुवादित केलेली पुस्तकं वाचकप्रिय आहेत.