बाणी बसू
बाणी बसू याचा जन्म ११ मार्च १९३९ रोजी झाला. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, अनुवादिका, समीक्षक, बालसाहित्यिक आणि प्राध्यापिका म्हणून त्या बंगालमध्ये ओळखल्या जातात. ‘आनंदमेला' आणि 'देश' या नियतकालिकांमधून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. त्यांच्या अनेक कथा व कादंबऱ्यांवर चित्रपट व टीव्ही सिरिअल्स बनवल्या गेल्या आहेत. त्यांना ‘ताराशंकर अवॉर्ड’, ‘आनंद पुरस्कार', 'सुशीलादेवी बिर्ला पुरस्कार', ‘साहित्य सेतू' आणि ‘साहित्य अकादमी' असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.