बी.के. गर्दे

व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या भालचंद्र गर्दे यांनी नागपूरहून बी.एस्सी. व बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम.टेक. केलं. १९३९ साली त्यांनी ऑल इंडिया रेडिओ (आता आकाशवाणी) मध्ये नोकरी स्वीकारली. त्यातील तांत्रिक बाजूंच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत १९७४ मध्ये ते डेप्युटी चीफ इंजिनिअर म्हणून निवृत्त झाले.
नोकरीच्या काळात त्यांच्या भारतभर बदल्या झाल्या. आकाशवाणीत नोकरी असल्यामुळे निरनिराळ्या राज्यांतील सुशिक्षित समाज, तेथील शैक्षणिक दर्जा यांची त्यांना जवळून ओळख झाली. काही काळ यु.पी.एस.सी.त संलग्न सभासद म्हणून व स्वतःच्या खात्याच्या अंतर्गत नेमणुका/प्रमोशन संबंधात त्यांनी ४००च्या वर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यात चांगली बुद्धिमत्ता, विषयातील ज्ञान यात सरस असूनही मराठी मुले मागे पडतात, याचं कारण इंग्रजीत संवाद साधण्यात अपयश हे त्यांना दिसून आलं. या मुलांना मार्गदर्शन मिळावं या हेतूने गर्दे यांनी आपल्या इंग्रजी भाषेच्या व्यासंगातून जमवलेलं अनुभवजन्य विचारधन ‘इमप्रेसिव्ह इंग्लिश’ (Impressive English) या पुस्तकाच्या रूपाने वाचकांपुढे ठेवलं आहे.

लेखकाची पुस्तकं

इम्प्रेसिव्ह इंग्लिश


बी.के. गर्दे


व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा ‘प्रभावी इंग्रजी’चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता

  • नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल.
  • नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍यांसाठी.
  • व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी.
  • परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी
  • इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी.
  • चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी.
  • भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी.
  • कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.

90.00 Add to cart