अनुराधा गोयल
बिझनेस इनोव्हेशन्स, विशेषतः बिझनेस मॉडेल्सचा अभ्यास हा अनुराधा यांचा आस्थेचा विषय आहे. त्याबाबत त्या ब्लॉगही लिहितात. सी.आय.आय.ने प्रकाशित केलेल्या 'इंडिया इनोव्हेट्स' या मालिकेच्या त्या सहलेखिका होत्या. २०१० साली झालेल्या इकॉनॉमिक टाइम्सच्या 'पॉवर ऑफ आयडिया' या स्पर्धेसाठी त्यांना परीक्षक म्हणून काम केलं. त्यांनी बिझनेस इनोव्हेशन्स या विषयावर अनेक प्रबंध लिहिले असून ते विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.