अनुराधा बेनीवाल
हिचा जन्म हरियाणातल्या रोहतक जिल्ह्यातल्या खेडी महम या गावात १९८६ मध्ये झाला. इयत्ता बारावीपर्यंत तिचं घरीच अनौपचारिक शिक्षण झालं. वयाच्या पंधराव्या वर्षी तिने बुद्धीबळामधील राष्ट्रीय विजेतेपद मिळवलं. सोळाव्या वर्षी जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर तिने स्पर्धात्मक बुद्धीबळातून निवृत्ती घेतली. दिल्लीतल्या मिरांडा हाउस कॉलेजमधून इंग्रजी विषयात बी.ए. (ऑनर्स) ही पदवी मिळवली. त्यानंतर एल.एल.बी. ही पदवी घेतली. नंतर इंग्रजीत एम. ए. देखील केले. त्या दरम्यान विविध प्रकारच्या कामांच्या माध्यमातून तिचा क्रीडाविश्वाशी संबंध कायम राहिला. सध्या ती लंडनमधली प्रसिद्ध बुद्धीबळ प्रशिक्षक आहे आणि केंब्रिज विद्यापीठासाठी स्वतः बुद्धीबळ खेळतेही. मनाने 'बॅकपॅकर प्रवासी' असलेली अनुराधा तिच्या भटकंतीचं वर्णन 'यायवरी आवारगी' या मालिकेद्वारे वाचकांपर्यंत पोचवणार आहे.