देवेंद्र भागवत
देवेंद्रबद्दल... देवेंद्रने पुण्यातील अभिनव कलामहाविद्यालयातून 'अप्लाइड आर्ट' मध्ये पदवी घेऊन पुढे अॅनिमेशन क्षेत्रात काम सुरू केलं. लहान मुलांसाठी अनेक अॅनिमेशन फिल्म्स, टीव्ही सिरिअल्स, आणि जाहिरातींसाठी त्याने काम केलं. ड्रॉईंग आणि रेषेवर प्रभुत्व असल्याने देवेंद्रने लवकरच त्याच्या क्षेत्रात स्वतःची एक ओळख तयार केली. 'उचापती गोलू' हे लहान मुलांसाठी गोष्टीचं पुस्तक त्याने लिहिलं आणि त्यासाठी सुंदर चित्रंही काढली. देवेंद्र चित्रं, रंग, शैली, माध्यमं यात प्रयोग करत राहिला. हळूहळू रिअलिस्टिक शैलीकडून कंटेंपररी शैलीकडे त्याचा प्रवास होत गेला. चित्र, शिल्प, पॉटरी अशी वेगवेगळी माध्यमं हाताळत राहिला. काही आर्ट रेसिडेन्सीजमध्ये त्याने मेटलमध्ये इंस्टॉलेशन्स करून पाहिली.
जगण्याची भरभरून इच्छा असलेला देवेंद्र २०२१च्या एप्रिल महिन्यात कोविडच्या आजारपणात त्याची चित्रं, रंग आणि जिवलगांना सोडून कायमचा दूर निघून गेला.