राक्षस आणि पोपटाची अॅडल्ट कथा
₹195.00
लेखक : श्रीकांत बोजेवार
संशयी वृत्तीचा बळवंत पत्नी सुलोचनाकडून वाट्टेल तेव्हा, हवं तसं सुख ओरबाडून घेतो. पण एरवी तिला कवडीचंही मोल देत नाही. पण एकदा सुलोचना अशी काही शक्कल लढवते की, बाजी पूर्णतः पलटून जाते… राहुल आणि आपल्या त्या ‘एकांतगोष्टी’ पाहायला तो कावळा रोज खिडकीजवळच्या फांदीवर बसत नसेल ना? या प्रश्नाने सानिकाचं मन पोखरतं. तिची आई तिला काळा गूळ वापरून एक उपाय करायला सांगते. त्या उपायाने तिच्या मनातली अस्वस्थता क्षमते का ? त्या कावळ्याचं रहस्य असतं तरी काय?… एकदा लेखकाला कथेचं बीज सुचतं. पण पुढच्या क्षणी ते निसटून जातं. तो त्या बीजाचा शोध घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो. मेंदू-तज्ज्ञाला भेटून मेंदूचा कोपरान् कोपरा शोधतो. शेवटी ते बीज सापडेल असं वाटतं, पण… साध्या घटना-प्रसंगांमधून आणि नेमक्या, खुसखुशीत संवादांमधून मिश्किल, उपहास आणि ब्लॅक कॉमेडी यांचा चपखल वापर करत अंतर्मुख करणाऱ्या ९ कथांचा गुच्छ…
Reviews
There are no reviews yet.