आपले सण उत्सव आणि त्यातील विज्ञान
₹180.00
लेखक : डॉ वर्षा जोशी
आपण मराठी माणसं वर्षभरात अनेक छोटे-मोठे सण-उत्सव साजरे करत असतो, त्यांचा आनंद घेत असतो. आनंद मिळवण्याबरोबरच त्यातून आपण आपली संस्कृतीही जपत असतो.
हे सण-उत्सव, दिनविशेष साजरे करणं पूर्वापार परंपरेने चालत आलं आहे. परंतु जनमानसात ते रुजवण्यामागे पूर्वजांचे काही निश्चित उद्देश होते, प्रयोजन होते. सणांचे दिवस साजरे करण्याच्या काही पद्धती त्यांनी आखून दिल्या आहेत तसेच आहार-विहाराविषयी काही दंडकही घालून दिले आहेत.
लेखिका डॉ. वर्षा जोशी या विज्ञानाच्या अभ्यासक. आम्ही त्यांची आजवर दैनंदिन विज्ञानाची पुष्कळ पुस्तकं प्रकाशित केली आहेत. सदर पुस्तकात त्यांनी आपले सण-उत्सव कसे साजरे करावेत याविषयी शास्त्रशुद्ध माहिती-ज्ञान देऊन सण-उत्सवांचं प्रयोजन आणि परंपरेने चालत आलेली नियमनं यांची कारणमीमांसा केली आहे, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. निसर्ग आणि सण-उत्सव यांचं नातं सांगितलं आहे.
आपल्याला मार्गदर्शन करून, ज्ञानसंपन्न करून
आपल्या आनंदात भर टाकणारं पुस्तक… आपले सण, उत्सव आणि त्यातील विज्ञान
Reviews
There are no reviews yet.