चाला… ‘फिट’ रहा

चालण्याच्या नियोजनबध्द व्यायामासाठी पध्दतशीर मार्गदर्शन


लेस स्नोडॉन
अनुवाद :डॉ. अरुण मांडे


चालण्याचा व्यायाम
टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन
कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन
0 सर्वात सुरक्षित व्यायाम
0 हृदयाचे कार्य व श्वसनाचे काम दीर्घकाळ उत्तम ठेवण्यासाठी
0 वजन कमी करण्यासाठी अर्थात् जास्त झालेली चरबी व कॅलरी कमी करण्यासाठी
0 कंबर, मांडया आणि पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी
0 तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी
0 शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी
0 तरुण व वृध्द- सर्वांसाठी
0 सोपा, सरळ व अतिशय उपयुक्त असा व्यायाम- चालण्याचा व्यायाम


175.00 Add to cart

हृदय-स्वास्थ्य

आहार व आरोग्य


जी. पद्मा विजय
अनुवाद :डॉ. अरुण मांडे


हृदयाची योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम त्याचे कार्य कसं चालतं याची माहिती असणं आवश्यक आहे. तसेच हृदयाला पोषक अशा अन्नघटकांचं नेमकं कार्य कोणतं, हृदयरोगाची कारणं व लक्षणं कोणती हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.
हृदयाचे संरक्षण करण्यासाठी अन्न हे आघाडीच्या सैनिकासारखे काम करते. आहारावर लक्ष ठेवून तुम्ही हृदयरोग किंवा ‘हार्ट-अ‍ॅटॅक’ची शक्यता खूपच कमी करू शकता.
आहाराची योग्य निवड ही फक्त हृदयरोग्यांचीच गरज नसून सर्वांचीच आहे. पण हृदयरोग्यांच्या दृष्टीने आहाराचं महत्त्व जास्त आहे.
सुदैवाने भारतीय पाकशास्त्रामध्ये शाकाहारी व मांसाहारी व्यंजनांचे प्रकार व वैविध्य खूप आहे. रायते, चटणी, सॉस, पोळी, भाकरी, पुलाव, खिचडी, सुकामेवा, कमी गोड असलेले पदार्थ, पौष्टिक नाष्टा यांचेही अनेक प्रकार आहेत. तेला-तुपाचा वापर कमी करूनही चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थ बनविता येतात.
या पुस्तकात हृदयाचे कार्य, त्याचे आरोग्य व त्यासाठी योग्य आहार याविषयी संपूर्ण माहिती देऊन लो-कॅलरी, लो-कोलेस्टेरॉल, लो-फॅट असलेल्या, करायला सोप्या परंतु हृदयरोग्यांना अतिशय पोषक तरीही चविष्ट अशा १२५ पाककृतीही दिल्या आहेत.


175.00 Add to cart

हृदयविकार कसा टाळाल?

गप्पा डॉक्टरांशी मालिका


डॉ. जावडेकर


आपल्या आजाराविषयीच्या शंकांना सविस्तर उत्तर देण्यास डॉक्टरांना वेळ नसतो . तसेच अनेक पुस्तकांतील माहिती क्लिष्ट असते . मात्र शंका – समाधान स्वरुपातील या पुस्तकांत सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती देऊन डॉक्टरांनी आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन केलं आहे . दुखणी टाळण्यासाठी किंवा आजाराचे वेळीच निदान होण्यासाठी अथवा असलेला आजार अधिक बळावू नये यासाठी ही पुस्तकं अतिशय उपयुक्त आहेत .


50.00 Add to cart