यशोदा वाकणकर
यशोदा वाकणकर ही अनिल व अनिता अवचट यांची धाकटी मुलगी . लहानपणी झोपडपट्टीतल्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकली . कॉलेजमध्ये ' कमर्शिअल आर्ट मध्ये शिक्षण घेतलेल्या यशोदाने अनेक वर्ष आर्टिस्ट म्हणून काम केलं . परंतु , स्वतःला असलेल्या एपिलेप्सीच्या व्याधीतून प्रेरणा घेऊन यशोदाने २००४ मध्ये पुण्यात ' संवेदना फाऊंडेशन ' -एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू केला . त्यासाठी तिने क्लिनिकल सायकॉलॉजी मध्ये एम.ए. केलं . बंगलोर युनिव्हर्सिटीतून ' डिप्लोमा इन एपिलेप्सी केअर ' केलं . गेली अठरा वर्ष कार्यरत असलेली ' संवेदना फाऊंडेशन ' ही संस्था एपिलेप्सी विवाह मंडळ , गरिबांसाठी एपिलेप्सी औषध मदत योजना , एपिलेप्सी जनजागृती अशा अनेक एपिलेप्सीशी निगडित पैलूंवर अविरत काम करत आहे . आज हे काम केवळ महाराष्ट्रातच नाही , तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे . यशोदाला माणसं जोडायला खूप आवडतं . गेली अनेक वर्ष तो विपश्यना करते . यशोदाला शास्त्रीय संगीत , बागकाम , हिमालयातील भटकंती , वाचन , लिखाण , स्वयंपाक असे अनेक छंद आहेत .