विक्रांत पांडे

विक्रांत पांडे यांनी मराठीतली उत्तम पुस्तकं इंग्रजी भाषेत अनुवादित केली आहेत. गिरीश कुबेर यांचं 'टाटायन (द टाटाज् हाऊ अ फॅमिली बिल्ट अ बिझनेस अँड अ नेशन)' या अनुवादाला 'गज कॅपिटल बेस्ट बिझनेस बुक अॅवॉर्ड, २०१९' हा सन्माननीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या इतिहासावर त्यांनी लिहिलेलं 'द एस.बी.आय. स्टोरी टू सेंच्युरीज ऑफ बँकिंग' (२०१९) या पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. स्टोरीटेल या ऑडिओ बुक कंपनीसाठी त्यांनी काही अनुवाद तसंच काही लेखन केलेलं आहे. आय.आय.एम. बंगळुरू इथले पदवीधर असलेले विक्रांत आता पूर्ण वेळ लेखन करतात.