विजय पाडळकर
कथा, कादंबरी, ललित लेखन आणि चित्रपट आस्वाद अशा विविध क्षेत्रांत गेल्या तीस वर्षांपासून विजय पाडळकर यांनी लक्षणीय लेखन केलं आहे. त्यांची आजवर २५ स्वतंत्र आणि ६ अनुवादित पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सत्यजित राय आणि गुलजार यांच्या चित्रपटांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. ‘माध्यमांतर-साहित्यातून चित्रपटाकडे' ही त्यांची चित्रपट अभ्यासाच्या दिशेचा वेध घेणारी सहा पुस्तकांची मालिका प्रकाशित झाली आहे. ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘केशवराव कोठावळे पुरस्कार', ‘आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्कार', ‘बी. रघुनाथ पुरस्कार' यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ते १९९६ सालच्या लातूर जिल्हा साहित्य संमेलनाचे आणि २०१० सालच्या ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तसेच महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणूनही सहभागी होते. त्यांनी ‘पिंजरा' या लघुपटाची त्यांनी निर्मिती केली असून ते महाराष्ट्रात विविध ठिकाणी अभिजात जागतिक साहित्य, हिंदी सिनेसंगीत व चित्रपट रसास्वादावर त्यांनी व्याख्याने देतात.