विजय नागास्वामी

विजय नागास्वामी यांनी मद्रास मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची पदवी संपादित केली असून मानसोपचारशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदविका मिळवली आहे. सुरुवातीची काही वर्षं (१९८४-१९९१) त्यांनी ‘स्किझोफेनिया रिसर्च फाउंडेशन’साठी काम केलं. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी त्यांनी सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. १९९१ ते ९७च्या दरम्यान त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात शिरकाव केला आणि चेन्नईमधील एका पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये एच.आर. विभागात काम केलं. १९९७ पासून व्यक्ती, जोडपी आणि कॉर्पोरेटजगताशी निगडित मानसोपचारपद्धतींवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आतापर्यंत त्यांची समुपदेशनावरची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यातील बरीच पुस्तकं ‘बेस्ट सेलर’ ठरली आहेत.