विजय गोखले
भारतीय परराष्ट्र सेवेत चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले विजय गोखले जानेवारी २०२० मध्ये परराष्ट्र सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या कारकिर्दीतला बराचसा काळ त्यांनी चीनशी संबंधित विषयांवर काम करण्यात व्यतीत केला. हाँगकाँग, तैपेई आणि बीजिंग इथे त्यांनी केलेल्या शिष्टाईच्या कामगिऱ्या आणि नवी दिल्लीमध्ये विविध पातळ्यांवर केलेलं काम यांमुळे त्यांना चिनी मुत्सद्दी अधिकाऱ्यांच्या वाटाघाटीच्या पद्धतींबद्दलची मर्म समजली. २००० सालापासून विविध मुद्द्यांवर चीनशी बोलणी करण्याचा त्यांना वैयक्तिक अनुभव होता, त्यांपैकी काही मुद्द्यांची मांडणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. सध्या ते पुण्यामध्ये आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून चीनबद्दलचा अभ्यास करत आहेत.