सुनीता भोसले

सुनीता भोसले यांनी घरच्या परिस्थितीमुळे सहावीपर्यंतच शिक्षण घेतलं. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी ‘मानवी हक्क अभियान’ अधिवेशनाद्वारे सामाजिक कामात प्रवेश केला आणि ‘भारिप बहुजना’द्वारे त्या सामाजिक कामात सहभागी झाल्या. त्यांनी ‘भारिप बहुजन महासंघा’चे दीड वर्ष काम केलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ‘मानवी हक्क अभियाना’त कार्यकर्ती म्हणून सामाजिक काम केलं आहे. गायरान जमिनी, अ‍ॅट्रोसिटी, पोलीस अत्याचार या संदर्भातही त्यांनी कार्य केलं आहे. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी समाज संघटना’ याची महिला प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. २०११मध्ये त्यांनी ‘क्रांती’ संस्थेची स्थापना केली. शिवाय पारधी क्षेत्रात शिक्षण, आरोग्य, बालविवाह प्रतिबंध, अ‍ॅट्रोसिटी, पारधी विकास आराखड्यावर त्यांनी काम केलं आहे.