सुमेध वडावाला (रिसबूड)

श्रेष्ठ कथाकार ( दिवंगत ) के. ज. पुरोहित यांच्या नावाने, वर्षातल्या सर्वोत्तम कथेला दिला जाणारा 'शांताराम पुरस्कार' ; पहिल्याच वर्षी म्हणजे १९९ २ मध्ये वडावाला लिखित कथेला मिळाला आणि १९८६ पासून लेखनारंभ केलेल्या सुमेध वडावाला यांच्या प्रवासाकडे जाणकारांचं लक्ष वेधलं गेलं. नंतरच्या ३५ वर्षांत, त्यांची जवळपास ३५ पुस्तकं प्रकाशित झाली. कथासंग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन, ललितलेखन, आदी अनेक साहित्य प्रकारांच्या पुस्तकांत त्यांनी लिहिलेल्या 'आत्मकथा’ अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. समीक्षकांनी 'सामाजिक आगळीवेगळी वा कौटुंबिक मात्र चाकोरीबाह्य विषय' आणि 'अनवट, अवघड, शैली' ही त्यांच्या कथालेखनाची जी वैशिष्ट्यं सांगितली ती वैशिष्ट्यं त्यांनी लिहिलेल्या आत्मकथांतही दिसून येतात.'महाराष्ट्र शासन' , साहित्य परिषद ’ यांच्या पुरस्कारांसह , ‘श्री . दा . पानवलकर पुरस्कार' , ' राजेंद्र बनहट्टी पुरस्कार ’ , ‘ डॉ . अ . वा . वर्टी पुरस्कार '; आदी सोळा - सतरा पुरस्कारांनी त्यांच्या लेखनाच्या उच्च गुणवत्तेची जणू साक्ष दिली.'