शुचिता नांदापूरकर-फडके

डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकांनी शतक पार केलं असून त्यांची ८२ पुस्तकं नामवंत प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केली आहेत. कोसळू पाहणाऱ्या विवाहसंस्थेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या 'तुझ्या सवे' आणि 'शुभमंगल' या पुस्तकांच्या त्या सहलेखिका आहेत. 'अलकेमिस्ट' या पाऊलो कोएल्हो लिखित जागतिक कीर्तीच्या पुस्तकाच्या त्यांनी केलेल्या अनुवादाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, उत्तम अनुवादाचा (२०१९) पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक मंडळाने २०२२ साली अनुवाद क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी त्यांना पुरस्कृत केलं आहे.

लेखकाची पुस्तकं

Explore Other Authors