निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू
शोभा भालेकर
एकूण आठ कथांचा हा वाचनीय असा कथासंग्रह. या कथा अतिशय तरल आणि जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, पात्र या कथांमध्ये भेटत राहतात. गुंगवून टाकणाऱ्या शैलीतून लेखिका शोभा भालेकर घराघरातल्या अनेक बोलक्या कहाण्या सांगतात. काही पात्रांमध्ये आपण आपल्यालाच शोधत राहतो तर काही प्रसंग जे आपल्याही आयुष्यात घडून गेलेले असतात त्यांचाही आपल्याला पुनःप्रत्यय येत राहतो, तसे प्रसंग नव्याने समोर आल्यामुळे आपण काहीसे चकितही होतो. आपण थोड्या सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने जर आयुष्य बघू लागलो तर किती सुंदर, लोभसपणे जगता येऊ शकेल याची प्रचीती नकळतपणे कथांमधून येत जाते. प्रत्येक वाचकाला गुंतवून ठेवणारा विविधरंगी कथांचा संग्रह….
निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू !