शरद पवार

भारतीय राजकारणात गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले नेते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार अतिशय महत्वाची भूमिका बजावत आले आहेत. त्यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाची पदं भूषवली आहेत. ती म्हणजे- तीनदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय कृषिमंत्री. १९९९मध्ये त्यांनी राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. २००५ ते २००८ शरद पवार BCCIचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. २०१० ते २०१२ या काळात त्यांनी ICCचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. गेली अनेक वर्षं राजकारणाशिवाय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते उल्लेखनीय काम करत आहेत. ते अतिशय जाणकार वाचक असून राजकारण, समाजकारणाशिवाय मराठी साहित्यातील नवीन लेखन नेहमी वाचत असतात.