समीर गायकवाड

समीर रावसाहेब गायकवाड सोलापूर येथे वास्तव्यास. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी हे मूळ गाव. शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एम.ए. (मराठी) उत्तीर्ण झाल्यानंतर सेट-नेट परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही प्राध्यापकी पेशा न स्वीकारता शेती, व्यवसायावर उदरनिर्वाह. विविध विषयांवर लिहिताना भिन्न साहित्यप्रकारात लेखन. विख्यात दैनिकांत, नियतकालिकांत विपुल स्तंभलेखन. सातत्यपूर्वक ब्लॉगलेखन. वेश्यांच्या जीवनाचे अप्रकाशित पैलू समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न, संलग्न माहिती विविध सरकारी यंत्रणांना पुरवतानाच या समस्येकडे समाजाचे भान वळवण्यासाठी समाज माध्यमांत हेतूतः लेखन. साहित्यनिर्मिती करत असतानाच सामाजिक जाणिवांतून घटनांवर पोटतिडकीने परखड भाष्य.