सईद मिर्झा

भारतातील ' समांतर चित्रपट प्रवाहा'तील एक अग्रणी व पुरोगामी चित्रपट दिग्दर्शक म्हणून सर्वज्ञात असलेल्या सईद मिर्झ यांनी पुण्याच्या एफटीआयआय ' मधून प्रशिक्षण घेऊन आपल्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली . देशातील राजकीय - सामाजिक समस्यांबाबत वस्तुनिष्ठपणे आणि विश्लेषणात्मक पद्धतीने भाष्य करणारे आगळे समाजाभिमुख व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली . ' अरविंद देसाई की अजीब दास्तान ' ( ( १ ९ ७८ ) , ' अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है ' ( १ ९ ८० ) , ' मोहन जोशी हाजीर हो ' ( १ ९ ८४ ) , ' सलिम लंगडे पे मत रो ' ( १ ९ ८ ९ ) , ' नसीम ' ( १ ९९ ५ ) आदी चित्रपटांद्वारे त्यांनी जनसामान्यांच्या व उपेक्षित घटकांच्या मनात दबलेल्या तणावांचा , अवहेलनेचा व समाजातील अंतर्विरोधांचा संवदेनशीलतेने मागोवा घेतला . त्याचप्रमाणे ' नुक्कड ' व ' इंतजार ' या आपल्या दूरदर्शनवरील मालिकांद्वारे उपेक्षित घटकांतील समुहजाणीवेचं आगळं दर्शन घडवलं . १ एप्रिल , २०११ रोजी ' एफटीआयआय'चे अध्यक्ष म्हणून सूत्रं स्वीकारणाऱ्या सईद मिर्झ यांनी यापूर्वीही तेथील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे .