नाइन्टीन नाइन्टी
सचिन कुंडलकर
आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक
सचिन कुंडलकर…
या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा
एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !
चित्रपट-दिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले सचिन कुंडलकर एक संवेदनशील कथा-कादंबरीकार तसंच स्तंभलेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ‘कोबाल्ट ब्लू’ ही त्याची पहिली कादंबरी समीक्षक आणि वाचक दोघांनी प्रशंसली. याशिवाय त्यांनी नाटकंही लिहिलेली आहेत. गेली पंधरा वर्षं ते सातत्याने स्तंभलेखन करत आहेत, तसंच पटकथांची निर्मितीही करत आहेत. आजवर त्यांनी नऊ चित्रपट दिग्दर्शित केले असून ‘निरोप’ आणि ‘गंध’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत.
'नाइन्टीन नाइन्टी' या त्यांच्या ललितलेखांच्या पुस्तकात त्यांनी संक्रमण काळात वाढलेल्या पिढीचं, सतत वेगाने बदलत राहणाऱ्या काळाचं, शहरांचं चित्रण केलं आहे. जगभर फिरताना आलेले अनुभव, नव्या-जुन्या आठवणी ते या लेखांमधून शेअर करतात आणि जगाकडे पाहण्याचा एक ‘युनिक’ – खास त्यांचा असा दृष्टिकोन आपल्या पुढ्यात ठेवतात.
सचिन कुंडलकर
आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक
सचिन कुंडलकर…
या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा
एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !