ऋजुता कर्णिक- गुप्ते
या अनुभवी बहुभाषिक भाषांतरकार असून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि जर्मन भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. मुंबईतून एम.बी.ए. केल्यानंतर त्यांनी काही काळ मानव संसाधन व्यवस्थापन विभागात काम केलं. जर्मनीतील वास्तव्यामध्ये जर्मन भाषा शिकल्यानंतर त्यांनी काही वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये जर्मन भाषेच्या अनुवादक म्हणून काम केलं. त्यांना कवितालेखनाची विशेष आवड असून काव्य-स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिकं मिळवली आहेत.
'मी, पाकिस्तानातील भारताचा हेर' हे त्यांचं पहिलंच अनुवादित पुस्तक असून त्यांनी अनुवाद केलेली काही पुस्तकं प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.




