प्रवीण दवणे

जन्म : ६ एप्रिल १९५९ (कल्याण जि. ठाणे) शिक्षण : एम. ए. (प्रमुख विषय - मराठी) व्यवसाय : पस्तीस वर्षे मराठी भाषेचे अध्यापन. लेखन : विविध साहित्यप्रकारात एकशे तीस पुस्तके प्रकाशित. कविता, गीतरचना, ललित लेख, बालसाहित्य, कथा, नाटके, कादंबरी अशा विविध वाङ्मयप्रकारात विपुल लेखन. महत्त्वाचे सन्मान इंदोर, बडोदा, विटा, नांदेड, बेळगाव येथील विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे. अमेरिकेत सॅनहोजे येथील पहिल्या विश्व साहित्य संमेलनात निमंत्रित साहित्यिक. निवडक पुरस्कार : सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयाचा 'राज्य पुरस्कार' - पाच वेळा. गीतलेखनासाठी - महाकवी ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा 'चैत्रबन', 'जनकवी पी. सावळाराम', मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा - 'शांता शेळके सरस्वती पुरस्कार', पुणे ग्रंथालय -'साहित्य सम्राट न. चिं केळकर', नाशिक सार्वजनिक वाचनालय 'डॉ. अ. वा. वर्टी कथा पुरस्कार', ठाणे ग्रंथालय 'रेगे पुरस्कार' -असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त.