प्रशांत रुपवते
प्रशांत रूपवते हे सुमारे दीड दशकापेक्षा जास्तकाळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी १९९६पासून वृत्तपत्रामध्ये लेखनास सुरुवात केली. त्यांनी मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये सेंट झेविअर्स महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. ‘आपलं महानगर’ या दैनिकामध्ये स्तंभलेखनास प्रारंभ केल्यानंतर ते दैनिक ‘महानगर’मध्ये पत्रकार म्हणून रुजू झाले. त्यापूर्वी ते ‘दैनिक लोकमत’मध्ये कार्यरत होते.
२००२-०३मध्ये भूम-परांडा इथे झालेल्या पारधी हत्याकांड निमित्त ‘संपर्क’ संस्थेने बालकृष्ण रेणके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापिलेल्या ‘सत्यशोधन समिती’मध्ये त्यांचा सहभाग होता. तसंच, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिंदे या गावातील दलितांवर टाकण्यात आलेल्या बहिष्कार प्रकरणी ‘डॉ. आंबेडकर राईटस लॉ नेटवर्क या संस्थे’ने स्थापलेल्या २००४-०५ यावर्षीच्या सत्यशोधन समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी २००४ ते २०१३ या दरम्यान, मुंबई उच्च न्यायालय, टाडा, सत्र न्यायालय आणि दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयांमधील खटल्यांचं वार्तांकन केलं आहे. सध्या मुक्त पत्रकार म्हणून त्यांचे विविध विषयांवर लेखन सुरू असून विशेषत: जातपंचायती व ओबीसी धर्मांतर या संबंधाने त्यांचा अभ्यास सुरू आहे.
‘पदोन्नती आणि आरक्षण’ या पुस्तकाचं संपादन आणि लेखन त्यांनी केलं आहे.