निर्मला मोने

लेखकाची पुस्तकं

मुलांसाठी ओळख पर्यावरणाची


निर्मला मोने


उद्या जगात सुखानं रहातायावं ही तुमची आमची सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी काय करायला हवं कसली काळजी घ्यायला हवी काय टाळायला हवं हे कळून घेणं आपलं कामच आहे .



80.00 Add to cart

शेरू


निर्मला मोने


शेरू तसं सांगायला वाघाचं पिल्लू पण खरं तर आम्हा भावंडांपैकीच एक वाटायचा तो आम्हाला. जरा जास्तच लाडका, लाडावलेला. खायला, खेळायला, फिरायला, मस्ती करायला तो आमच्याबरोबर असायचाच; पण गप्पा मारताना, गोष्ट सांगता-ऐकतानाही तो असणं आवश्यक असायचं. निदान त्याला तसं वाटायचं. बोलताना मधे मधे त्याचं नाव घेतलं नाही तर त्याला वाईट वाटायचं. ते त्याच्या चेहर्‍यावर दिसायचंच. आवडीच्या खेळात त्याचा चेहरा अगदी हसरा व्हायचा, इतका की मिशा वर जायच्या आणि दु:खाची गोष्ट ऐकताना शेरूचे सुस्कारे सगळ्यात मोठयाने ऐकू यायचे. त्याला आमच्या आधीच खाऊ द्यावा लागायचा आणि वर मोठयानीही आपल्या वाटणीतून त्याला आणखी द्यावं असं जणू सांगत तो समोरच बसे. आम्हाला खेळायलाही ओढून नेई. आणि तरी…


50.00 Read more