मीना चंपानेरकर

मीना चंपानेरकर यांचा जन्म 29 जुलै 1930 चा, तर त्यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 2020 रोजी झाला. एक कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावताना त्यांनी वाचन व गायनाच्या आवडी ही जोपासल्या. त्याच प्रमाणे आपल्यातील पाककलानिपुणतेचा आस्वादही अनेकांना दिला. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या पदार्थांचा स्वाद व्यापक प्रमाणात घेता यावा यासाठी त्यांनी 'आज्जीच्या चविष्ट पाककृती' हे पारंपारिक पदार्थांचं पुस्तक साकारलं.

लेखकाची पुस्तकं

आजीच्या विशेष चवीच्या पाककृती

…व्हेज-नॉनव्हेज


मीना चंपानेरकर


रोजच्या जेवणातले भाजी-आमटी-उसळीसारखे पदार्थ वैशिष्टयपूर्ण पध्दतीने व अधिक रुचकर कसे करता येतील याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
यात आजीच्या म्हणून अशा काही खास पाककृती आहेत, ज्या आजच्या तरुण पिढीला आणि इतर सर्वांना नक्कीच करून बघाव्याशा वाटतील. मग त्यामध्ये अगदी साधी अशी एखादी भाजी असेल, आमटी असेल किंवा एखादा चमचमीत नॉनव्हेज पदार्थ असेल. नेहमीच्या चवीला कंटाळलेल्यांसाठी एक विशेष चवीचा ब्रेक- मीना चंपानेरकर यांच्या ‘आजीच्या विशेष चवीच्या पाककृती’…!


45.00 Add to cart