मानव कौल
बारामुल्लामध्ये जन्मलेल्या मानव कौल यांनी चित्रपटसृष्टीत अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या तिन्ही प्रांतात गेल्या २० वर्षांत स्वतःचं नाव ठसठशीतपणे उमटवलं आहे.
अर्थात त्यांच्यासाठी लेखन हीच सर्वांत आनंददायी गोष्ट आहे. लेखनाच्या प्रांतात त्यांना सर्वांत सुरक्षित वाटतं असं ते म्हणातात. वीस वर्षांपूर्वी लेखनप्रवास सुरू केलेल्या मानव यांनी विशेषतः गेल्या सहा वर्षात कसदार लेखन केलं आहे. 'रूह' हे त्यांचं नववं पुस्तक. या पुस्तकातून एका काश्मिरी व्यक्तीच्या मनात, त्याच्या आठवणींमध्ये लपलेलं काश्मीर उलगडतं. या पुस्तकाला स्वतःशीच केलेला संवाद असंही म्हणता येईल. कौल यांची पुस्तकं हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय ठरली आहेत.