माधवी मेहेंदळे

नेत्रशल्यविशारद म्हणून पस्तीसहून अधिक वर्ष प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव असलेल्या डॉ. माधवी मेहेंदळे यांना चित्रकलेत विशेष रुची आहे. त्यांनी एस.एन.डी.टी., पुणे येथून 'मास्टर इन फाइन आर्ट्स पेंटिंग' हा दोन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केला आहे. 'मास्टर इन व्हिजुअल आर्ट्स' हा अभ्यासक्रमही त्यांनी एस.एन.डी.टी. येथून केला आहे.

'सकाळ', 'लोकसत्ता', 'साप्ताहिक सकाळ', 'अंतर्नाद', 'माहेर' आदी दैनिकांमधून आणि मासिकांमधून त्यांनी ललित लेखन केलं आहे.

त्यांची 'आरएक्स', 'दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेलअँजेलो'. 'दृष्टीपटल' आणि 'चेकपॉइंट चार्ली' अशी ललित लेखनाची चार पुस्तकं यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी 'दैवी प्रतिभेचा कलावंत मायकेलअँजेलो' या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार व 'दृष्टीपटल' या पुस्तकास पुणे नगर वाचन मंदिर यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लेखकाची पुस्तकं

पॉल गोगँ एक कलंदर कलाकार

 


माधवी मेहेंदळे


मॉडर्न आर्टचा जनक पॉल गोगँ…. एक जगप्रसिद्ध प्रतिभावान कलाकार….. सिम्बॉलिझम, सिंथेटिझम, क्लाइझोजिनम अशा चित्रकलेतील विविध शैली त्याने विकसित केल्या आहेत. चित्रकलेसोबतच त्याने शिल्पकला (Sculpture), काष्ठशिल्प (Woodcraft), सिरॅमिक या माध्यमांतूनही त्याने प्रचंड निर्मिती केली आहे. अनेक समकालीन चित्रकारांमध्ये गोगँने स्वतःची वैशिष्ट्यं राखली आणि एवढंच नव्हे तर, पिकासोसारख्या कलाकारावरही गोगँच्या चित्रकलेचा प्रभाव दिसून येतो.

या पुस्तकात लेखिका डॉ. माधवी मेहेंदळे यांनी गोगँच्या एकंदर कलाप्रवासाचा आणि कलावैशिष्ट्यांचा मागोवा घेतला आहे. त्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. कलाविश्वातील त्याच्या मुशाफिरीसोबतच पुस्तकात त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, नातेसंबंधांचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि मनस्वी स्वभावाचाही धांडोळा घेतला आहे. ताहिती बेटावरील वास्तव्य हा गोगँच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय… त्याचेही तपशील पुस्तकात सापडतील.

पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे गोगँच्या कलावैशिष्ट्यांची वाचकांना प्रचिती यावी यासाठी पुस्तकात अनेक तपशिलांसह समाविष्ट केलेली रंगीत चित्रं. चित्रकलेच्या इतिहासात ‘माइल स्टोन’ ठरलेल्या कलाकाराचा सर्वांगीण धांडोळा घेणारं पुस्तक पॉल गोगँ : एक कलंदर कलाकार


 

500.00 Add to cart