लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख हे निवृत्त प्रशासकीय IAS अधिकारी २०१८मध्ये बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची आजवर एकतीस मराठी, पाच इंग्रजी व दोन हिंदी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आजही त्यांचा लेखनप्रवास अव्याहतपणे चालू आहे. त्यांना राज्य शासनाचे तीन, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेचे पाच महाराष्ट्र साहित्य परिषद-औरंगाबादचे दोन आणि अन्य वाङ्मयीन संस्थांचे विविध साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'भारतीय संविधान' हा त्यांचा श्रद्धेचा तसेच अभ्यासाचा विषय व ते विचार आपल्या दैनंदिन जीवनात जगण्याचा प्रयत्न... मुस्लिम समाज व त्यांचं जीवन, उर्दू भाषा, LGBTQ समाजाचं जगणं व त्यांचे प्रश्न समजून घेणं, आंतर भारतीच्या विचारांचा प्रसार आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणं हे देशमुखांच्या आजच्या जगण्याचा अपरिहार्य भाग झाले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सक्तीने मराठीचा कायदा मंजूर करून घेण्यात पुढाकार..... मराठी भाषा विद्यापीठ आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण कायद्यासाठी पाठपुरावा... 'मराठीच्या भल्यासाठी' या मराठीच्या विकास करणाऱ्या संस्थेचे कार्याध्यक्ष.... अशा सर्व विधायक कामात गर्क राहता राहता देशमुख बॅडमिंटन व टेबल टेनिस या खेळांची आवड जोपासतात... खेळ-खेळाडू यांच्याविषयी आत्मीयता बाळगतात आणि त्यांचं जीवनचरित्र वाचण्यात रस घेतात. त्याचप्रमाणे बॉलिवूड स्टार्स, गोल्डन इराचं फिल्म संगीत, संगीतकार, गीतकार यांत मनापासून रमतात.