खुशवंत सिंग

खुशवंत सिंग हे सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि संपादक म्हणून ओळखले जातात. परंतु वाचकांना यांची खरी ओळख आहे ती कादंबरीकार आणि सडेतोड लेखन करणारे स्तंभलेखक म्हणून. ते ‘योजना’ आणि ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या नियतकालिकांचे संपादक होते. तसेच त्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ आणि ‘हिंदुस्तान टाइम्स’ या दैनिकांचे संपादकपदही भूषवलं आहे.
‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘आय शॅल नॉट हिअर द नाइिंटगेल’ आणि ‘दिल्ली’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या आहेत. त्यांनी वयाच्या ९५व्या वर्षी ‘सनसेट क्लब’ हे पुस्तक लिहिलं. २००२ साली प्रकाशित झालेलं त्यांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरलं. शिखांच्या इतिहासावर लिहिलेला ‘अ हिस्टरी ऑफ द सिख्स’ हा त्यांचा द्विखंडात्मक ग्रंथही महत्त्वाचा ठरला. याशिवाय त्यांनी दिल्ली, उर्दू काव्य, निसर्ग, शीख धर्म या त्यांना आवडणाऱ्या विषयांवरही विपुल लेखन केलं आहे. २००७ साली ‘पद्म विभूषण’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. वयाच्या 99व्या वर्षी या अवलिया लेखकाचं निधन झालं.

लेखकाची पुस्तकं

मनःपूर्वक खुशवंत

जीवन, मरण आणि त्या दरम्यान…


खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे


* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’

* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’

* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’

निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!


225.00 Add to cart