खुशवंत सिंग

खुशवंत सिंग हे सुप्रसिद्ध लेखक, पत्रकार आणि संपादक म्हणून ओळखले जातात. परंतु वाचकांना यांची खरी ओळख आहे ती कादंबरीकार आणि सडेतोड लेखन करणारे स्तंभलेखक म्हणून. ते ‘योजना’ आणि ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ या नियतकालिकांचे संपादक होते. तसेच त्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ आणि ‘हिंदुस्तान टाइम्स’ या दैनिकांचे संपादकपदही भूषवलं आहे. ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘आय शॅल नॉट हिअर द नाइिंटगेल’ आणि ‘दिल्ली’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या आहेत. त्यांनी वयाच्या ९५व्या वर्षी ‘सनसेट क्लब’ हे पुस्तक लिहिलं. २००२ साली प्रकाशित झालेलं त्यांचं आत्मचरित्र वादग्रस्त ठरलं. शिखांच्या इतिहासावर लिहिलेला ‘अ हिस्टरी ऑफ द सिख्स’ हा त्यांचा द्विखंडात्मक ग्रंथही महत्त्वाचा ठरला. याशिवाय त्यांनी दिल्ली, उर्दू काव्य, निसर्ग, शीख धर्म या त्यांना आवडणाऱ्या विषयांवरही विपुल लेखन केलं आहे. २००७ साली ‘पद्म विभूषण’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. वयाच्या 99व्या वर्षी या अवलिया लेखकाचं निधन झालं.